Showing posts with label कृषिराजा. Show all posts
Showing posts with label कृषिराजा. Show all posts

Tuesday, March 29, 2011

अखिल भारतीय हळद परिषद २०११

अश्वमेध कृषि दूत आणि अश्वमेध हर्बल रिसर्च , डेव्हलेपमेंट ट्रस्ट , कोपरगाव आयोजित अखिल भारतीय हळद परिषद २०११काल शिर्डी मध्ये पार पडली.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून शेतकरी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे
१- मधुकर दंडवते साहेब -
२- मा. दत्तू नाना कोल्हे साहेब -
३- मा. नारायण पावसे साहेब
४- मा. विनायकराव दंडवते साहेब
५- मा. वाघ साहेब
६- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे साहेब उपस्थित होते .
नारायण पावसे साहेबांनी हळद पिकाचे महत्त्व सांगितले जगातील ८० % उत्पादन भारतात होते आणि प्रामुख्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , कर्नाटका , आसाम, महाराष्ट्रात सांगली, सातारा, हिंगोली, चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन होते.
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड महत्त्वाची बाजारपेठ . हळदीची वायदे बाजारात उलाढाल सुरु झालेली असल्याने तिचे महत्त्व वाढत आहे.
त्यांनी कमी उत्पन्नाचे कारणे सांगितले
१- पारंपारिक पद्धत
२- सिंचनाचा अभाव
३-प्रक्रिया न केलेले , कीडयुक्त बेणे
४- संतुलित खतांचा अभाव
५- कीड आणि रोगाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने नाही.
६- काढणी नंतरचे तंत्रज्ञान माहिती कमी
नंतर
ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बिनचूक तांत्रिक माहिती मिळत नसल्याने शेतकरी संकुचित होतो आहे. हळद पीकाला सोन्यासारखे भाव मिळत आहे तरी देखील पिकाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत नाही . शेती आधुनिक पद्धतीने कारणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी हि हळद परिषद आयोजित केलेली आहे.
त्यांनी हळद लागवडीसाठी मे ते जून हे महिने उपयुक्त असल्याचे सांगून लागवड अक्षय तृतीयेला करावी असे सांगितले.
एकरी ६ ते ७ क्वि. मातृकंद शक्यतो वापरावे. गादी वाफ्यावर लागवड करावी. रुंद गादी वाफा बनवणे , बेड ६० * ७५ से मी उंची एक ते दीड फुट आणि दोन ओळीतील अंतर ४० * २५ से मी , दोन ओळीत एक इनलाइन वापरावे. त्यामुळे बेणे कमी लागते , झाडांची संख्या योग्य राहते , ३० ते ३५ क्वि उत्पादन मिळते. हळद लागवडीनंतर १५ दिवसात उगवते , १५ दिवसानंतर साडे पाच महिन्यापर्यंत पानच वाढतात , साडे पाच महिने ते साडे सात महिने बगल गड्डा अवस्था त्यामध्ये कंद वाढतो जवळजवळ ५ते ७ फुटवे होतात . आणि नंतर साडे सात महिने ते नऊ महिने हळकुंड भरणे अवस्था अशा प्रकारे नऊ महिन्याचे हे पिक आहे. ठिबक संचाचा वापर केल्याने पाणी ६० % बचत होऊन उत्पादनात ४० % वाढ होते. उत्त्पन्न ओली हळद - १७० ते १९० क्वि आणि सुकल्यानंतर ३० ते ४० क्वि. हळद पिक घेतल्यानंतर परत त्याच जमिनीत हळद पिक घेऊ नका असे त्यांनी सांगितले .

Wednesday, May 26, 2010

कृषिराजा


कृषि शेत्रात वाढत चाललेल्या माहिती तंत्रज्ञानाचा लाभ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही अधिकाधिक कृषिविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पारंपारिक ज्ञानावर आधारलेल्या भारतीय शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या हेतूने हा माहितीचा साठा " कृषिराजा " साठीच.
शेतीविषयक गरजा ओळखून शेती व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व शाश्वत होणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक उन्नती साधण्यासाठी जमीन, पाणी या नैसर्गिक साधनांचे व्यवस्थापन करणे, एकात्मिक किड, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे.
शेतीत आधुनिकता आणणे, माहितीचे जाळे संकलित करून त्याचा शेतीसाठी वापर करणे, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करणे यामुळे पिक आणखीन बहरेल यात शंकाच नाही. पूर्वी माहिती मिळणे अवघड होते. एखादा शेतकरी यशस्वी शेती करत असेल तर आसपासचे शेतकरी त्याच्या शेतावर जाऊन प्राथमिक माहिती मिळवत होते. पण आता माहिती तंत्रज्ञानामुळे विकासाचे, माहितीचे दालन उपलब्ध होते.
शेतकऱ्यांची हि तरुण पिढी संगणकाचा वापर करून डाळींबाच्या बागा फुलवत आहे .
माझ्या या कृषिराजा ब्लॉग मध्ये शेतीविषयक महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल ,

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...