rss
twitter
    Find out what I'm doing, Follow Me :)

गणपती बाप्पा मोरया GANPATI BAPPA MORYA

Tuesday, March 29, 2011

अखिल भारतीय हळद परिषद २०११

अश्वमेध कृषि दूत आणि अश्वमेध हर्बल रिसर्च , डेव्हलेपमेंट ट्रस्ट , कोपरगाव आयोजित अखिल भारतीय हळद परिषद २०११काल शिर्डी मध्ये पार पडली.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून शेतकरी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे
१- मधुकर दंडवते साहेब -
२- मा. दत्तू नाना कोल्हे साहेब -
३- मा. नारायण पावसे साहेब
४- मा. विनायकराव दंडवते साहेब
५- मा. वाघ साहेब
६- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे साहेब उपस्थित होते .
नारायण पावसे साहेबांनी हळद पिकाचे महत्त्व सांगितले जगातील ८० % उत्पादन भारतात होते आणि प्रामुख्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , कर्नाटका , आसाम, महाराष्ट्रात सांगली, सातारा, हिंगोली, चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन होते.
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड महत्त्वाची बाजारपेठ . हळदीची वायदे बाजारात उलाढाल सुरु झालेली असल्याने तिचे महत्त्व वाढत आहे.
त्यांनी कमी उत्पन्नाचे कारणे सांगितले
१- पारंपारिक पद्धत
२- सिंचनाचा अभाव
३-प्रक्रिया न केलेले , कीडयुक्त बेणे
४- संतुलित खतांचा अभाव
५- कीड आणि रोगाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने नाही.
६- काढणी नंतरचे तंत्रज्ञान माहिती कमी
नंतर
ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बिनचूक तांत्रिक माहिती मिळत नसल्याने शेतकरी संकुचित होतो आहे. हळद पीकाला सोन्यासारखे भाव मिळत आहे तरी देखील पिकाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत नाही . शेती आधुनिक पद्धतीने कारणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी हि हळद परिषद आयोजित केलेली आहे.
त्यांनी हळद लागवडीसाठी मे ते जून हे महिने उपयुक्त असल्याचे सांगून लागवड अक्षय तृतीयेला करावी असे सांगितले.
एकरी ६ ते ७ क्वि. मातृकंद शक्यतो वापरावे. गादी वाफ्यावर लागवड करावी. रुंद गादी वाफा बनवणे , बेड ६० * ७५ से मी उंची एक ते दीड फुट आणि दोन ओळीतील अंतर ४० * २५ से मी , दोन ओळीत एक इनलाइन वापरावे. त्यामुळे बेणे कमी लागते , झाडांची संख्या योग्य राहते , ३० ते ३५ क्वि उत्पादन मिळते. हळद लागवडीनंतर १५ दिवसात उगवते , १५ दिवसानंतर साडे पाच महिन्यापर्यंत पानच वाढतात , साडे पाच महिने ते साडे सात महिने बगल गड्डा अवस्था त्यामध्ये कंद वाढतो जवळजवळ ५ते ७ फुटवे होतात . आणि नंतर साडे सात महिने ते नऊ महिने हळकुंड भरणे अवस्था अशा प्रकारे नऊ महिन्याचे हे पिक आहे. ठिबक संचाचा वापर केल्याने पाणी ६० % बचत होऊन उत्पादनात ४० % वाढ होते. उत्त्पन्न ओली हळद - १७० ते १९० क्वि आणि सुकल्यानंतर ३० ते ४० क्वि. हळद पिक घेतल्यानंतर परत त्याच जमिनीत हळद पिक घेऊ नका असे त्यांनी सांगितले .

Tuesday, December 21, 2010

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन
कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा. कांदा पिकास तांबे लोह जस्त व बोरोन या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळे कांदा उत्पादनात वाढ होते व कांदा साठवणुकीसाठी देखील टिकतो

सेंद्रिय खते
शेणखत / कंपोस्ट २० ते २५ बैलगाडी - एकरी
गांडूळ खत ४०० ते ६०० किलो - एकरी

हंगामानुसार लागणारी खते
खरीप - नत्र [ १०० ], स्फुरद [५० ], पालाश [५० ]
रांगडा- नत्र [ १५० ], स्फुरद [५० ], पालाश [५० ]
रब्बी- नत्र [ १५० ], स्फुरद [५० ], पालाश [ ८० ]
जमिनीतून - फेरस सल्फेट [चीलेटेड ] व म्येग्नेशीयम सल्फेट ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे

कांदा - पाणी व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापन
कांद्यासाठी पाण्याच्या पाळ्या ह्या जमीन व हवामान यावर अवलंबून असते. ठिबक सिंचन व तुषार सिंचनामुळे उत्पादनात वाढ होते .ठिबक सिंचन पद्धतीमुळे लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होते. उन्हाळ्यात हलक्या जमिनीत गरजेनुसार कांद्यास ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामातील पिकास ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे . तसेच रब्बी हंगामात १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.
कांदा

कांदा- तण व्यवस्थापन

तण व्यवस्थापन
कांद्यासाठी स्टोम्प एक्स्ट्रा आणि गोल , टरगा सुपर हे उपयुक्त तणनाशक आहे
रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर सुमारे ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी
तणनाशक फवारणीसाठी विशिष्ट प्रकारचा नोझल वापरावा .

Thursday, November 25, 2010

कांदा - रोपांची पुनर्लागण

रोपांची पुनर्लागण
सपाट वाफ्यांना पाणी देऊन त्यात रोपांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात १० x १० से मी या अंतराप्रमाणे २ x ३ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात अनुक्रमे ४०० ते ६०० रोपे बसतात. रोपे लावताना ती अंगठ्याने दाबून लावल्यामुळे कांद्याच्या माना वाकड्या होतात. कांदा वाढीस वेळ लागतो. रोपे अंगठ्याजवळील पहिल्या बोटाबरोबर जमिनीत घुसवावीत. जमिनीची मशागत चांगली झाली असेल आणि वाफ्यातील माती चांगली मऊ आणि भुसभुशीत असेल तर कोरड्यात रोपांची लागवड करून नंतर पाणी दिले तर रोपे चांगली जगतात.
ठिबक किंवा तुषार सिंचनाखाली लागवड करावयाची झाल्यास ठिबक किंवा तुषार संच लागवडी अगोदर चालू करावा. साधारणपणे ३ ते ४ से मी खोलीवर ओल जाईल इतपत पाणी द्यावे. दुस-या दिवशी वाफ्यावर रोपांची लागवड करावी आणि नंतर पाणी द्यावे
रोपे ५० ते ५५ दिवसात लागवडीसाठी तयार होतात. लागवडीच्यावेळी रोपांची गाठ लहान हरभ-याएवढी झाली पाहिजे. रोपे उपटण्या अगोदर वाफ्यांना हलके पाणी द्यावे म्हणजे रोपे , मुळे विशेष न तुटता उपटता येतात. रोपे उपटल्यानंतर त्याच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा व मुळे पाण्यात धुवून घ्यावीत.

कांदा रोप वाटिका तयार करणे

रोप वाटिका तयार करणे
निरोगी रोपे तयार करून त्यांची लागवड केली म्हणजे कांदा उत्पादनाची निम्मी लढाई जिंकली असा अर्थ होतो. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी जवळ - जवळ १० ते १२ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. रोप वाटीकेची जागा पाण्याच्या स्त्रोताजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते. लव्हाळा किंवा हराळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोप वाटीकेसाठी टाळावी .रोप नेहमी गादी वाफ्यावर तयार करणे चांगले कारण गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही. त्यामुळे रोपे सहज उपटून काढता येतात. गादी वाफे १ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची १५ से मी ठेवावी . गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम मिश्रखत घालावे. खते आणि वाफ्यातील माती मिश्र करून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत आणि वाफा सपाट करावा. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्या बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. जर गादी वाफा करणे शक्य नसेल तर नेहमीप्रमाणे सपाट वाफे करावेत .वाफ्याची रुंदी १ मीटर आणि लांबी ३ ते ४ मीटर ठेवावी. त्यात वरीलप्रमाणे बियाणे पेरावे. बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्टर लागवडीसाठी ६ ते ७ किलो बी पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बी पेरावे. म्हणजे एका वाफ्यावर ३० ग्रॅम बी पेरावे. बी फेकून पेरले तर दोन ओळी आणि रोपे यांमध्ये समान अंतर राखता येत नाही . म्हणून बी नेहमी ओळीतच पेरावे. लागावणीसाठी रोपे ५० ते ५५ दिवसात तयार होतात.

Tuesday, November 23, 2010

कांदा जमिन

जमिन
मध्यम ते भारी , चांगली निचरा असणारी २५ ते ९० सेमी खोलीची जमीन चांगली मानवते. हलक्या व मध्यम भारी जमिनीत कांदा चांगला पोसतो. क्षारवट व चोपण जमिनी कांद्यास मानवत नाही, उथळ हलक्या जमिनीत खतांचा वापर करून लागवड उपयुक्त ठरते . सामू ६.५ ते ७ असलेली जमीन चांगली.पानथळ जमिनीत लागवड टाळावी.