Monday, June 21, 2010
बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी -
-परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.
-बियाणे खरेदी करीत असताना सीलबंद नसलेले बियाणे दर्जाची खात्री नसल्याने ते खरेदी करू नये.
-खरेदी केलेल्या बियाण्या बाबद संपूर्ण तपशील असलेली [उदा. पिक, वाण, लेबल नंबर, लोट नंबर, वजन, तपासणीचा दिनांक , वैध मुदत, बियाणे किंमत, खरेदीदाराचे, उत्पादकाचे,विक्रेत्याचे नाव, तसेच विक्रेत्याची सही इ. ] रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.
-बियाणे खरेदी करतांना त्यावरील वैध मुदतीची खात्री करून वैध मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे.
-छापील किमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करू नये.
-विशिष्ट संशोधित वाणाचा आग्रह न धरता त्याच गुणधर्माचे अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे शक्यतो खरेदी करावे.
-बियाणे खरेदी केल्यानंतर खरेदीची पावती, वेष्टन व त्यावरील लेबल आणि पिशवीतील थोडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.
-बियाणे दर्जा / उगवणक्षमता / भौतिक शुद्तेबाबत शंका असल्यास कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी . जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे .
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
कांदा- खत व्यवस्थापन
खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...
-
तण व्यवस्थापन कांद्यासाठी स्टोम्प एक्स्ट्रा आणि गोल , टरगा सुपर हे उपयुक्त तणनाशक आहे रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर सुमारे ४५ दिवसांनी एक ख...
-
ORGANICTA ........................ being NATURAL
-
हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत...
No comments:
Post a Comment