Thursday, November 25, 2010

कांदा - रोपांची पुनर्लागण

रोपांची पुनर्लागण
सपाट वाफ्यांना पाणी देऊन त्यात रोपांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात १० x १० से मी या अंतराप्रमाणे २ x ३ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात अनुक्रमे ४०० ते ६०० रोपे बसतात. रोपे लावताना ती अंगठ्याने दाबून लावल्यामुळे कांद्याच्या माना वाकड्या होतात. कांदा वाढीस वेळ लागतो. रोपे अंगठ्याजवळील पहिल्या बोटाबरोबर जमिनीत घुसवावीत. जमिनीची मशागत चांगली झाली असेल आणि वाफ्यातील माती चांगली मऊ आणि भुसभुशीत असेल तर कोरड्यात रोपांची लागवड करून नंतर पाणी दिले तर रोपे चांगली जगतात.
ठिबक किंवा तुषार सिंचनाखाली लागवड करावयाची झाल्यास ठिबक किंवा तुषार संच लागवडी अगोदर चालू करावा. साधारणपणे ३ ते ४ से मी खोलीवर ओल जाईल इतपत पाणी द्यावे. दुस-या दिवशी वाफ्यावर रोपांची लागवड करावी आणि नंतर पाणी द्यावे
रोपे ५० ते ५५ दिवसात लागवडीसाठी तयार होतात. लागवडीच्यावेळी रोपांची गाठ लहान हरभ-याएवढी झाली पाहिजे. रोपे उपटण्या अगोदर वाफ्यांना हलके पाणी द्यावे म्हणजे रोपे , मुळे विशेष न तुटता उपटता येतात. रोपे उपटल्यानंतर त्याच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा व मुळे पाण्यात धुवून घ्यावीत.

No comments:

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...