रोप वाटिका तयार करणे
निरोगी रोपे तयार करून त्यांची लागवड केली म्हणजे कांदा उत्पादनाची निम्मी लढाई जिंकली असा अर्थ होतो. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी जवळ - जवळ १० ते १२ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. रोप वाटीकेची जागा पाण्याच्या स्त्रोताजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते. लव्हाळा किंवा हराळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोप वाटीकेसाठी टाळावी .रोप नेहमी गादी वाफ्यावर तयार करणे चांगले कारण गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही. त्यामुळे रोपे सहज उपटून काढता येतात. गादी वाफे १ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची १५ से मी ठेवावी . गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम मिश्रखत घालावे. खते आणि वाफ्यातील माती मिश्र करून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत आणि वाफा सपाट करावा. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्या बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. जर गादी वाफा करणे शक्य नसेल तर नेहमीप्रमाणे सपाट वाफे करावेत .वाफ्याची रुंदी १ मीटर आणि लांबी ३ ते ४ मीटर ठेवावी. त्यात वरीलप्रमाणे बियाणे पेरावे. बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्टर लागवडीसाठी ६ ते ७ किलो बी पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बी पेरावे. म्हणजे एका वाफ्यावर ३० ग्रॅम बी पेरावे. बी फेकून पेरले तर दोन ओळी आणि रोपे यांमध्ये समान अंतर राखता येत नाही . म्हणून बी नेहमी ओळीतच पेरावे. लागावणीसाठी रोपे ५० ते ५५ दिवसात तयार होतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
कांदा- खत व्यवस्थापन
खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...
-
तण व्यवस्थापन कांद्यासाठी स्टोम्प एक्स्ट्रा आणि गोल , टरगा सुपर हे उपयुक्त तणनाशक आहे रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर सुमारे ४५ दिवसांनी एक ख...
-
ORGANICTA ........................ being NATURAL
-
हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत...
No comments:
Post a Comment